Breaking News

मीनानाथ खराटे, अनुराधा ठाकूर यांना पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : रचना कला महाविद्यालय व वुई केअर मल्टी स्टोअर्स प्रा.लि., पुणे यांच्या वतीने दिवंगत चित्रकार व कला अध्यापक अर्जुनराव शेकटकर व दत्तात्रय कांबळे यांच्या नावाने स्मृती पुरस्कार मागील चार वर्षांपासून दिले जात आहे. 
या वर्षीचा कै.शेकटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘कलार्जुन’ पुरस्कार अकोले येथील मॉडर्न हायस्कूलचे कला अध्यापक मीनानाथ खराटे यांना तर कै.कांबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार ‘कलादत्ता’ पुरस्कार चित्रकार अनुराधा ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभासाठी उद्घाटक म्हणून आ.संग्राम जगताप, राज्य कला निरीक्षक भास्करराव तिखे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हूणन नगरसेवक गणेश भोसले, ‘वुई केअर’चे चेअरमन प्रसाद डोळसे, मुरलीधर बारवे, प्रकाश बोरुडे, रामराव नवले, सचिन जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच यावेळी दि.2 व दि.9 ला घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी कलारसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर, प्राचार्य सुभाष भोर व स्पर्धा संयोजिका वर्षा शेकटकर यांनी केले आहे.