Breaking News

घुले संस्थेत कृतीशील विद्यार्थी घडतात भाऊसाहेब सावंत यांचे प्रतिपादन


भेंडा/प्रतिनिधी ः लोकनेते मारूतराव घुले पाटील यांनी काळाची पावले ओळखून परिसरातील शेतकरी, कष्टकरी घटकांच्या उन्नतीसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दालन खुले केले. घुले पाटील शिक्षण संस्थेत शिकलेले विद्यार्थी देशविदेशात सेवा करत आहेत. या संस्थेत कृतीशील व सर्जनशील विद्यार्थी घडतात, असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत यांनी केले.
       नेवासे तालुक्यात भेंडा येथील जिजामाता पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनकर टेकणे होते.
याप्रसंगी रामेश्‍वर कंठाळे महाराज म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आई, वडील व शिक्षक यांची आज्ञा आयुष्यभर पाळावी. पैसे खर्च करून घेतलेल्या डॉक्टर, वकील यांच्या सल्ल्यातून तात्पुरता दिलासा मिळतो. परंतु शिक्षकाच्या मार्गदर्शनातून जीवन घडतेे. विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कृत व्हावे. सेवा व सदाचार ही संतांची शिकवण आचरणात आणावी, असेही ते म्हणाले.
       कार्यक्रमासाठी उपप्राचार्य दीपक राऊत, संदीप घोलप, सारिका माळवे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. राणी मुनस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री उंडे यांनी सर्वांचे आभार मानले.