अहमदनगर / प्रतिनिधी : ग्रामस्थांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आदर्शगाव मांजरसुंबा गावाचा चौफेर विकास सुरु आहे. येथील ग्रामस्थांच्या एकीमुळे ...
अहमदनगर / प्रतिनिधी
:
ग्रामस्थांच्या प्रबळ
इच्छाशक्तीमुळे आदर्शगाव मांजरसुंबा गावाचा चौफेर विकास सुरु आहे. येथील ग्रामस्थांच्या
एकीमुळे व झालेल्या विकास कामांमुळे गावाला नावलौकिक राज्यातच नव्हे तर देशपातळीवर
वाढला. कमिन्स कंपनीने ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा त्यांनी अधिकाधिक
लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, गावचा विकास पाहण्यासाठी खास युकेवरून आलो आणि गावाचा
विकास पाहून खऱ्या अर्थाने मी भारावून गेलो, असे प्रतिपादन कमिन्स इंडिया कंपनीचे युके
येथील ऑपरेशन डायरेक्टर जेम्स इवान यांनी केले.
कमिन्स इंडिया कंपनीने
आदर्शगाव मांजरसुंबा येथे विविध उपक्रमांची पाहणी करताना कंपनीचे युके येथील ऑपरेशन
डायरेक्टर जेम्स इवान, नगरचे प्लॅंट मॅनेजर किरण क्षीरसागर, एचआर प्रमुख आदित्य देसाई,
आयटी सीजीटी विश्वास कुलकर्णी, एचआर विभागाच्या अंजली मगर, सोमनाथ चॅटर्जी, सरपंच जालिंदर
कदम, जयराम कदम, इंद्रभान कदम, पांडुरंग कदम, तुकाराम वाखारे, रोहिणी कदम, पुष्पा कदम,
छाया कदम, रामदास वाघमारे, साहेबराव कदम, विलास भूतकर, सुदाम कदम आणि ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.