Breaking News

शेतबांधांमुळे जलस्रोतांची पाणीपातळी वाढेल आमदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन


पारनेर/प्रतिनिधी ः
प्रत्येक गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये जिरवण्याची गरज आजच्या काळात आहे. शेतजमिनीत शेतबांध तयार करून पाणी अडवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यकाळात शेतालगत असलेल्या जलस्रोतांची पाणीपातळी वाढेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
तालुक्यातील कान्हूर येथे मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार लंके बोलत होते. हा बंधारा 59 लाख 4 हजार रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक सुरेश धुरपते, जलसंधारणचे उपअभियंता काकडे, सरपंच हरीश दावभट, जयसिंग दावभट, लाकुडझोडे, योगेश दावभट, भागा कदम, भाऊसाहेब अडसूळ, संतोष कदम, भागा खरमाळे, अजय दावभट, दत्ता आवारी, कोंडीभाऊ काळे, दिनेश दावभट, सत्यम निमसे उपस्थित होते.
  आमदार लंके म्हणाले, अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही बरेच पाणी वाहून जात असते. वाहून जाणार्‍या पाण्यासाठी योग्य ठिकाणी बंधारे बांधून पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजेत. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती संपत्ती जपण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असेही लंके म्हणाले.