Breaking News

कमलनाथ सरकारचा जामखेडमध्ये निषेध
जामखेड/प्रतिनिधी
 समस्त समाजाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी मशीनद्वारे काढून टाकण्यात आला. या निंदनीय प्रकारामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारचा निषेध करत सरकारवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीचे निवेदन तहसीलदार विशाल नाईकवाडे जामखेड भाजपाच्या वतीने देण्यात आले.
 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती रवि सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, सुभाष आव्हाड, जि.. सदस्य सोमनाथ पाचरणे, सभापती गौतम उतेकर, अॅड. प्रविण सानप, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक अमित चिंतामणी, सरपंच बापुराव ढवळे, सरपंच लहु शिंदे, सरपंच हानुमंत उतेकर, तान्हाजी वाळुंजकर, माऊली जायभाय, बाजीराव गोपाळघरे, रौफ शेख राहुल राऊत, देवीदास पवार यांच्यासह तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते