Breaking News

महसूलच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामसभेचा अनादर तहसीलदारांसह संबंधितांवर कारवाईची कळस ग्रामस्थांची मागणी अकोले ता./प्रतिनिधी
 कळस ग्रामपंचायतच्या सन २०२० च्या प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच यांना नोटीस काढून बळेच हरकत दाखल झाल्याचे दाखवले असा आरोप करत  तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर ग्रामसभेचा अनादर केल्याची कारवाई व्हावी अशी मागणी कळस ग्रामस्थांनी केली आहे.
 जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच योगिता वाकचौरे व उपसरपंच दिलीप ढगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार यांनी प्रभाग रचना व आरक्षण घोषित करून नमुना 'ब' गावात डकविला. याला सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. ग्रामसभेत ठराव झाल्याप्रमाणे पुन्हा ग्रामसभा घेऊन नवीन वार्ड रचना करावी. आम्ही कसलीही हरकत दाखल केली नव्हती. कळस बु. ग्रामपंचायत २०२० च्या निवडणूक संदर्भात ग्रामसभेत झालेल्या ठरावाला केराची टोपली दाखवणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यात केली आहे.
 कळस बु. ग्रामपंचायत निवडणूक २०२० साठी तहसीलदार यांनी विशेष ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेसाठी निरीक्षक म्हणून अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. टी. सोनवणे उपस्थित होते. कामगार तलाठी जी. आर. गायकवाड यांनी प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चित केल्याची माहिती दिली. त्यावेळी सदस्य व त्यासाठीची लोकसंख्या यांचा ताळमेळ बसला नाही. म्हणून नवीन वार्ड रचना व लोकसंख्या आणि सदस्य संख्या यांचा ताळमेळ बसवून नव्याने ग्रामसभेत मांडावा असे सर्वानुमते ठरले. ग्रामसभेला अधिकार असताना त्याला केराची टोपली महसूल प्रशासनाने दाखवल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असताना उपविभागीय अधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच यांनाच नोटीस बजावली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


ग्रामस्थ घेणार अण्णा हजारेंची भेट 
 लोकसंख्या व जागा यांचा ताळमेळ न घालता प्रभाग रचना तयार करणारे तलाठी, ग्रामसभेत आरक्षण मंजूर नसताना घोषित करणारे तहसीलदार अन या दोन्हींना पाठीशी घालून सरपंच, उपसरपंच यांना नोटीस काढणारे उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा  हजारे यान्चीहीभात घेणार आहोत असे कळस ग्रामस्थांनी सांगितले.