Breaking News

जप्तीच्या नोटीसा निघताच भरली थकबाकी शेवगाव नगरपरिषदेचा पवित्रा


शेवगाव/ शहर प्रतिनिधी ः
नगरपरिषदेने घरपट्टी, नळपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीपोटी जप्तीच्या कारवाईच्या नोटीसा काढताच थकबाकीदारांनी रक्कम भरली.
मार्च अखेरच्या 2019-20च्या घरपट्टी, नळपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीपोटी मोठमोठ्या थकबाकीदारांना नोटिसा काढल्या होत्या. या नोटीसांमध्ये जप्तीच्या कारवाईची सूचना देण्यात आली होती.
यामुळे कारवाईच्या धाकाने काही तासातच बाकी भरण्यात आली.
7 फेबु्रवारी रोजी सिद्धिविनायक इंडस्ट्रीज, शिवप्रसाद अ‍ॅग्रो, बालाजी ऑईल मिल यांना जप्तीची नोटीस देण्यात आली होती. सिद्धीविनायक ने सात लाख, शिवप्रसादने एक लाख 30 हजार तर बालाजी ऑईल मिल ने एक लाख रुपयाचा धनादेश नगरपरिषदेला दिला.
  खासगी मालकी असलेल्या घरपट्टी, नळपट्टीच्या थकबाकीची वसुली होण्यासाठी मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन कट  करण्याची कारवाई सुरु आहे. पालिकेची सुमारे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीचे काम सुरु आहे. शेवगावकरांनी वसुलीस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, वसुली अधिकारी कोल्हे, साळवे यांनी केले आहे.