Breaking News

निर्भया दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर


नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका 5 मार्चपर्यंत टळली. वर्ष 2012 मधील दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात न्या. आर भानुमतींच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाला गृह मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी करायची आहे. यामध्ये दोषींना वेगवेगळी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्भयाच्या चारही दोषींसाठी दिल्लीच्या न्यायालयाने आधीच डेथ वॉरंट जारी केलेले आहे. या डेथ वॉरंटनुसार त्यांना 3 मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींना तीन मार्च रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी चारही दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनयकुमार शर्मा आणि अक्षयकुमार यांना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी केले आहे. याआधी फाशी देण्याची तारीख 22 जानेवारी निश्‍चित करण्यात आली होती. परंतु, 17 जानेवारीला न्यायालयाच्या आदेशानंतर ती फाशी टळली आणि पुन्हा 1 फेब्रुवारीला सहा वाजता नव्याने डेथ वॉरंट जारी केले होते. पुन्हा 31 जानेवारी रोजी कनिष्ठ न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती दिली होती.