Breaking News

दिल्लीत झालेली दंगल गृहमंत्र्याचे अपयश खासदार सुप्रिया सुळे यांची टीका


पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. शाहीनबागचे आंदोलन शमल्यानंतर पुन्हा ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सोमवारी वाद होऊन हिंसाचार झाला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हिंसाचाराचे खापर गृहमंत्री अमित शहा यांच्याच डोक्यावर फोडले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीतील हिंसाचाराची घटना ही धक्कादायक आहे. दिल्लीमध्ये ट्रम्पसाहेबांचा मोठा दौरा सुरू असताना तिथे दंगल होतेच कशी? हे सर्वतोपरी गृह मंत्रालयाचे अपयश आहे. याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला द्यावं. गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी? जर त्यांना हे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. असे खासदार सिु्प्रया सुळे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाल्या. महाविकास आघाडी सरकारविरोधात आज भाजपाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. यावरून सुळे म्हणाल्या, विरोधकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ते अतिशय चांगल्या रीतीने विरोधी पक्षाचे काम करीत आहेत. आमचे सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. विरोधकांनी आता पाच वर्षे त्यांचे काम चांगल्या पद्धतीनं करावं. हिंगणघाटबाबत सुळे म्हणाल्या, आपले गृह खाते सक्षम आहे. या प्रकरणी मुळाशी जाऊन काम करणार्‍यांच्या सूचनांचा विचार करून गृह मंत्रालय अशा घटना रोखण्याबाबत पुढे योग्य तो निर्णय घेईल.