Breaking News

भारताने करोना बाबत सावधानता बाळगावी


दिल्लीहून पुण्याला येणार्‍या ’एअर इंडिया’च्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलटी झाल्याने तिथे झालेला गोंधळ, विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाची पुण्यातील नायडू रुग्णालयात केलेली रवानगी, अन्य प्रवाशांची वैद्यकीय तपासणी, नंतर विमानाचे केलेले निर्जंतुकीकरण आणि या सार्‍यांमुळे विमानाच्या परतीच्या प्रवाशाला झालेला सहा तासांचा विलंब.याबरोबरच चीनमध्ये करोना व्हायरसचं प्रचंड थैमान माजल्याने लोकांनी घराबाहेर पडणंही सोडून दिलं आहे. एक व्यक्ती बाजारामध्ये केवळ 15 सेकंदासाठी एका महिलेच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  चीनच्या वुहान शहरातून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. या आजाराने चीनमध्ये आतापर्यंत 564 लोकांचा मृत्यू झाला आहे.व सुमारे 28 हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे.. करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हुबेई प्रांत आणि त्याच्या आसपासच्या शहरात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे.करोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. अनेक व्यवसायांवरही परिणाम होत आहे. करोना व्हायरसच्या भितीमुळे चीन, तैवानमधील मालिकांमध्ये चुंबनदृष्याच्या चित्रीकरणास बंदी आणली आहे. या सार्‍या गोष्टी ’करोना’ विषाणूमुळे निर्माण झालेली दहशत अधोरेखित करणार्‍या आहेत.भारतात चीनमधील या विषाणूने केरळात दाखल झाला आहे.
 दिल्लीहून पुण्याला येणार्‍या ’एअर इंडिया’च्या विमानात एका चिनी प्रवाशाला उलटी झाल्याने तिथे झालेला गोंधळ, विमान उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाची पुण्यातील नायडू रुग्णालयात केलेली रवानगी, अन्य प्रवाशांची वैद्यकीय तपासणी, नंतर विमानाचे केलेले निर्जंतुकीकरण आणि या सार्‍यांमुळे विमानाच्या परतीच्या प्रवाशाला झालेला सहा तासांचा विलंब. याबरोबरच चीनमध्ये करोना व्हायरसचं प्रचंड थैमान माजल्याने लोकांनी घराबाहेर पडणंही सोडून दिलं आहे. एक व्यक्ती बाजारामध्ये केवळ 15 सेकंदासाठी एका महिलेच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या व्यक्तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षिण पूर्व चीनमधील शुआंगडोंगफेंग बाजारात तो एका महिलेच्या बाजूला अवघा 15 सेकंद उभा होता. तिच्या संपर्कात येताच त्यालाही करोनाची लागण झाली. चीनच्या वुहान शहरातून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. या आजाराने चीनमध्ये आतापर्यंत 564 लोकांचा मृत्यू झाला आहे.व सुमारे 28 हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे. करोनाचं थैमान वाढतच असल्याने रुग्णालयात रुग्णांसाठीच्या खाटांची आणि आरोग्य चिकित्सेसाठी लागणार्‍या सुविधांची कमतरता भासत आहे. एकट्या वुहानमध्येच 8182 रुग्णांना 28 रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वुहानच्या सर्व रुग्णालयात केवळ 8254 खाटाच आहेत. करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने हुबेई प्रांत आणि त्याच्या आसपासच्या शहरात प्रवास करण्यास बंदी घातली आहे. तसेच लोकांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे.करोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. अनेक व्यवसायांवरही परिणाम होत आहे. करोना व्हायरसच्या भितीमुळे चीन, तैवानमधील मालिकांमध्ये चुंबनदृष्याच्या चित्रीकरणास बंदी आणली आहे. या सार्‍या गोष्टी ’करोना’ विषाणूमुळे निर्माण झालेली दहशत अधोरेखित करणार्‍या आहेत.
’करोना’चा संसर्ग जीवघेणा ठरत असल्याने आणि मृतांची संख्या वाढत या विषाणूचा चीनमधून सुरू झालेला संसर्ग जगाच्या विविध भागांत पोहचला असून, भारतासह किमान 25 देशांत या त्याचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत ’करोना’मुळे प्राण गमावलेल्यांची चीनमधील संख्या 722वर गेली होती आणि तेथील संसर्गग्रस्तांची संख्या 34 हजारांहून अधिक होती.विविध प्रकारच्या रोगांवर प्रतिबंधक लस शोधून त्यांवर मानवाने मात केली असली, तरी नवनवीन विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याने, त्यांचा संसर्ग जीवघेणा ठरतो. नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला चीनसह आग्नेय आशियात ’सार्स’ नावाचा श्‍वसनाचा विषाणूजन्य रोग निर्माण झाला आणि त्यावर मात करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागले. ’करोना’चा उद्रेक ’सार्स’हून मोठा असल्याचे दिसते आहे. ’करोना’चा प्रादुर्भाव झालेल्या वुहानमध्ये आणि हुबेई प्रांतात संसर्गाला अटकाव घालण्यासाठी चिनी प्रशासनाकडून आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्याबरोबरच मोठ्या संख्येने संसर्ग असलेल्या शहरांचा बाह्य जगताशी असलेला भौतिक संपर्क पूर्णपणे बंद करण्यापासून प्रवासबंदीपर्यंतचे उपाय केले जात आहेत. तरीही ’करोना’चा उद्रेक थांबलेला नाही. त्यामुळे चीन सरकारसमोरचे आव्हान वाढले आहे. ’करोना’मुळे चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली असून, त्याचा फटका अर्थव्यवस्थेसह अनेक क्षेत्रांना बसतो आहे.
बहुतेक देशांच्या विमान कंपन्यांनी चीनची हवाई वाहतूक सेवा तूर्तास स्थगित केली आहे. भारतासह अनेक देशांनी चीनमधील नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधील कामकाजांवरही निर्बंध आणले आहेत. चिनी पर्यटकांच्या संख्येत गेल्या पंधरा वर्षांत सातपटीने वाढ झाली असून, सध्या दरवर्षी सुमारे पंधरा कोटी पर्यटक जगभर फिरतात. या पर्यटकांद्वारे आपल्या देशात ’करोना’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. असे असले, तरी जपान, थायलंड, संयुक्त अरब अमिराती यांसह पंचवीस देशांत ’करोना’चे रुग्ण आढळले आहेत. भारतातही केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे केवळ चीनसमोरच नव्हे, तर अन्य देशांसमोरही ’करोना’ने आव्हान आहे. करोना विषाणूजन्य आजाराची वस्तुस्थिती दडपण्याचे प्रयत्न चीनने सोडल्यानंतर या आजारसाथीचे गांभीर्य समोर येताना दिसते. आधी ही साथ 2003 साली आलेल्या सार्स (सीव्हीअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी सीण्ड्रोम) आजाराइतकी भयानक नाही असे मानले गेले. निदान तसे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या साथीत चीनमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जणांचे प्राण गेले. पण ताज्या करोना विषाणूचे बळी त्यापेक्षा अधिक झाले असून या आजार प्रसारात खंड पडण्याची चिन्हे नाहीत. जानेवारीच्या तिसर्‍या आठवडयात जेव्हा अशा काही साथीच्या आजाराची चाहूल लागली, त्या वेळी या आजाराने ग्रासलेल्यांची संख्या 282 इतकी होती आणि वुहान प्रांतापुरतीच तिची लागण होती. पण फेब्रुवारीच्या सुरुवातीला, म्हणजे अवघ्या दहा दिवसांत, या आजाराने आडवे पडलेल्यांची संख्या 10 हजारांपेक्षा अधिक आहे आणि तो आजार वुहानबरोबरीने अन्य 19 प्रांतांत पसरलेला आहे. चीनबाहेरही डझनभर देशांत या आजाराची लागण झाल्याचे दिसते. फिलिपाइन्स आणि हाँगकाँग या दोन प्रांतांनी चीनबाहेरचे पहिले दोन बळी नोंदवले. भारतातील केरळात किमान तीन जणांना याची बाधा झाल्याचे दिसून येते. अशा नव्या आजाराची साथ रोखण्यात बर्‍याच अडचणी येतात. विषाणूंचे आव्हान मानवाला नवीन नाही हे खरे. विषाणूंचा अभ्यास करून त्यांना अटकाव घालण्यासाठीची लस मानवाकडून विकसित होत आली आहे. मात्र, आता विषाणूही स्वत:त बदल घडवून आणत आहेत. एकाच प्रकारचे विषाणू खूप झटकन बदल करीत असल्याने त्यांना तितक्याच वेगाने प्रतिसाद देण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच ’करोना’चे संकट केवळ चीनपुढील नसून, संपूर्ण जग आणि मानवजातीवरचे आहे.
संपर्काची साधने वेगाने वाढल्याने संपूर्ण जग जवळ येत असल्याने आणि विविध कारणांनी अन्य देशांत प्रवास करणार्‍यांची संख्याही वाढत असल्याने जग छोटे बनले आहे आणि सर्व देश जवळ आले आहेत. त्यामुळे जगाच्या एका कोपर्‍यात एखाद्या नव्या विषाणूचा झालेला उद्रेक हा गतिमानतेने अन्य भागांत पोहोचू शकतो. असा उद्रेक स्थानिक राहण्याची शक्यता कमी असते. ’करोना’च्या निमित्ताने आपण हे अनुभवतो आहोतच. हा विषाणू नवा आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात सध्या तरी प्रतिबंधात्मक लस नाही. ती येत्या काळात विकसित होणार यात शंका नाही. तसे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, लस विकसित होईपर्यंत तरी उपचारात्मक प्रयत्नांवरच भर द्यावा लागणार आहे. अशा वैद्यकीय आणीबाणीत अफवांना ऊत येतो. चीनमधील बळींची संख्या हजारोंवर नेण्यापासून तेथील रुग्णांना मारण्यासाठी हालचाली सुरू असल्यापर्यंतच्या अफवा आहेत. त्या दूर करण्यापासून कार्यक्षमतेने उपचारात्मक यंत्रणा उभारण्यापर्यंतची पावले संबंधित सरकारांना उचलावी लागतील. ’करोना’चा उद्रेक धडा देणाराही आहे. तो योग्य रीतीने घेतल्यास पुढील आव्हानांना अधिक सक्षमतेने सामोरे जाता येईल.भारतात चीनमधील या विषाणूने केरळात दाखल झाला आहे. त्या आजाराचे तीन रुग्ण आढळल्यानंतर केरळ सरकारने वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली असून ही साथ रोखण्यावर सर्व सरकारी लक्ष केंद्रित केले आहे. तथापि प्रश्‍न केरळचा नाही. कारण सामाजिक वैद्यक क्षेत्रात आघाडीवर असलेले हे राज्य नव्या साथीचा मुकाबला करेलच करेल. पण तोपर्यंत या आजाराच्या विषाणूने उत्तर प्रदेश वा बिहार यांसारख्या सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता यांचा दूरान्वयानेही संबंध नसलेल्या राज्यांत हातपाय पसरले तर काय, हा खरा प्रश्‍न आहे. जागतिक पातळीवर तज्ज्ञांना जी चिंता आफ्रिकी देशांबाबत आहे, ती आपल्याला दाट लोकवस्तीच्या राज्यांबाबत असायला हवी.