Breaking News

गुरव समाजाचे दि.16 ते 18 मार्चला मुंबईत धरणे

अहमदनगर/ प्रतिनिधी : “महाराष्ट्रात राहणारा गुरव समाज त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहिला आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरव समाजाच्या न्याय व हक्कांसाठी मुंबई येथे (दि.16 ते 18 मार्च) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे’’, असे आवाहन प्रदेशाध्यक्षा सुरेखा तोरडमल यांनी केले आहे.
गुरव समाजाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :- देवस्थान इनाम वर्ग 3 च्या जमिनी, वतन पूर्णतः खालसा करावा, देवस्थान इनाम वर्गमधील बेकायदेशीर हस्तांतर रद्द करून ही जमीन मूळ वहिवाटधारकाच्या नावे करण्यात यावी, देवस्थान इनाम वर्गमधील बेकायदेशीर कुळ काढून टाकण्यात यावेत. देवस्थानामध्ये 50 टक्के गुरव पुजार्‍यांना विश्‍वस्त म्हणून नेमण्यात यावे. मंदिरातील गुरव पुजार्‍याचे उत्पन्नाचे वंशपरंपरागत हक्क कायम ठेवण्यात यावा, तसेच जे गुरव पुजार्‍यास मंदिरातील पूजेपासून वंचित करण्यात आले आहे, अशांना पूर्ववत नेमावे, प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, जागा व निधी उपलब्ध करून द्यावा. 60 वर्षांवरील गुरव पुजार्‍यांना शासनाने निवृत्तीवेतन द्यावे. देवस्थान इनाम वर्ग जमिनीच्या शेती विकासासाठी शासनाकडून, तसेच विविध सहकारी सोसायट्यांकडून कर्जपुरवठा करावा. शासनाकडून ओबीसीसाठी निधीचे वाटप करताना गुरव समाजाच्या उत्पन्नासाठी न्याय वाटा मिळावा, गावपातळीवर गुरव समाजावर होणारे अन्याय, अत्याचार विरोधात समाज संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करावा आदी विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तोरडमल यांनी केले.