Breaking News

करोना’मुळे रेल्वेच्या 168 गाडया रद्द


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (सीओव्हीआयडी -1) पार्श्‍वभूमीवर भारतीय रेल्वेने गुरुवारी सांगितले की, रेल्वेच्या 168 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एकूण 155 जोडीच्या गाड्या आता रद्द झाल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी हे प्रमाण 166 वर पोहचले असून देशभरात पुन्हा 15 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने 20 ते 31 मार्च दरम्यानच्या प्रवासाच्या कमी जोड्या असलेल्या गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे अधिका-यांनी सांगितले की, ज्यांनी या गाड्यांच्या तिकीट काढलेल्या आहेत त्या सर्व प्रवाशांना वैयक्तिकरीत्या या निर्णयाबद्दल माहिती देण्यात येत आहे. रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांत प्रवासी वर्गात 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रवाशांची नोंद झाली आहे. देशभरातील मोठ्या स्थानकांवर होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी रेल्वेनेही 500 हून अधिक स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती 10 रुपयांवरून 50 रुपयांवर आणल्या आहेत. गुरुवारी, भारतात कोरोनाचे 19 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधित व्यक्तींची संख्या 166 वर आहे. भारतात कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण प्रत्येकी एक दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील आहेत. तर, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 49 वर पोहचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूचे युद्ध सुरू झाले असून सर्वांनी मिळून या युद्धाशी लढा देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. आवश्यकता नसेल तेव्हा घराबाहेर पडू नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षाच्या तुलनेत रेल्वेच्या प्रवासी संख्येत गेल्या आठवड्यात 69 लाखांची घट झाली आहे. ही टक्केवारी 45 इतकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी घटल्यामुळे त्याचा फटका रेल्वेच्या उत्पन्नाला बसला आहे. कोरोना विषाणूमुळे बुधवारी भारतीय रेल्वेकडून 99 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वेगाड्यांमध्ये आवश्यक प्रवासीच नसल्यामुळेही गाड्या रद्द करण्यात येत आहेत. मध्य आणि पश्‍चिम रेल्वे या दोन्ही ठिकाणी प्रवाशांकडूनच आपले आगाऊ आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेची आगाऊ आरक्षणे रद्द करण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 80 टक्क्याने वाढले आहे, असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या गुरुवारी सकाळी 166 पर्यंत जाऊन पोहोचली आहे.