Breaking News

राज्यातील सर्व शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर दहावी बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरुच राहणार


मुंबई : कोरोना व्हायरसमुळे राज्यातील शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. सोमवारपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व शाळा बंद राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्यातरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिम, चित्रपटगृह, मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या आहेत म्हणून बाहेर फिरू नये. असे आवाहन आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केले आहे. दरम्यान राज्यातील कोरोना व्हारसच्या रुग्णांची संख्या 22 वर पोहचली आहे. नागपूरमध्ये आणखी एक रुग्ण आढळून आल्याने नागपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 4 झाली आहे. पुण्यातील 10 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.