Breaking News

एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना भारतात करोना रुग्णांची संख्या 39 वर


तिरुअनंतपुरम (केरळ): केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 39 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री के के शैलजा यांनी कोरोनाच्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आल्याचे सांगितले. राज्यातील एका कुटुंबातील तीन लोक इटलीहून परतले होते आणि इतर दोन नातेवाईक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाल्याचेही शैलजा यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री शैलजा म्हणाल्या की, कोरोना संक्रमित रुग्णांनी कोणा-कोणाची भेट घेतली याचा आम्ही शोध घेत आहोत. आता दुसर्‍या देशातून आलेल्या नागरिकांना जबाबदारीने वागले पाहिजे. भारतात येताच त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. केरळमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित तीन प्रकरणांना दुजोरा मिळाला होता. या रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. कोरोना विषाणूने आणखी दोन राज्यात पाय पसरले. शनिवारी लडाखमध्ये या विषाणूने ग्रस्त दोघे सापडले तर तामिळनाडूमध्येही याने शिरकाव केला आहे. या व्यतिरिक्त ईराणहून परकेल्या लडाखच्या दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशा प्रकारे गेल्या 24 तासांच्या कालावधीत करोनाचे 8 नवे रुग्ण आढळले होते. केरळात आढळलेल्या नव्या रुग्णांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या पूर्वी केरळमध्ये करोनाचे तीन रुग्ण आढळले होते. ते सर्व बरे झाले आहेत. मात्र, आता आणखी 5 जणांना करोनाची लागण झाली आहे. यानंतर दिल्लीतही एक रुग्ण आढळला. शिवाय त्यांचे ओळखीच्या आणखी 6 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्षष्ट झाले. तसेच इटलीहून आलेल्या एकूण 18 लोकांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात एक भारतीय नागिरक आणि 17 इटलीचे नागरिक होते. या व्यतिरिक्त, गुरुग्राम, गाझियाबाद, तेलंगण आणि तामिळनाडूत एक-एक करोनाग्रस्त आढळला आहे. तर लडाखमधील दोन लोकांनाही करोनाची लागण झाली आहे. सध्या देशात 39 जणांना करोनाची लागण झाली असून पैकी तीन लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. म्हणजेच, सध्या भारतात करोनाच्या एकूण 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चीनमधील वुहान शहारातून करोना विषाणू संपूर्ण जगात पसरला आहे. जगभरात आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांचा करोना विषाणूने बळी घेतला आहे.