Breaking News

50 हजार रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ तिघांविरोधात गुन्हा दाखल


जामखेड/प्रतिनिधी ः 
मोबाईल दुकान टाकण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करुन छळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा 7 फेबु्रवारी 2018 रोजी शाहबाज मोहम्मद सय्यद (राहणार सदाफुले वस्ती, जामखेड) यांच्याशी विवाह झाला. पती अधूनमधून घरी दारू पिऊन येतात. ते नेहमीच शिवीगाळ आणि मारहाण करतात. याबाबत वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनीही सासरच्या मंडळींना समजावून सांगितले. परंतु एक-दोन महिन्यांनंतर पती पुन्हा दारु पिऊन मारहाण करु लागले. त्यांनी मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणण्यासाठी मागणीही केली. अशीच मागणी सासू-सासरेही करत आहेत. मारहाण करुन मला उपाशीपोटी ठेवण्यात येत आहे. तसेच मला मुलगी झाल्यानंतर कामधंदा नसल्याचे म्हणून पती मोबाईल दुकानासाठी पैसे आणण्यास सांगत आहेत, असेही फिर्यादीत म्हटले आहे.  त्यावरुन जामखेड पोलिसांनी पती शहाबाज मोहम्मद सय्यद, सासरे मोहम्मद हनीफ रइसोद्दीन सय्यद व सासू रुबीना मोहम्मद हनीफ सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पातकळ करत आहेत.