Breaking News

कोरोनासाठी देशातील विविध 56 ठिकाणी 52 प्रयोगशाळा : डॉ हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महत्वाची माहिती दिली. गुरुवारी लोकसभेत बोलताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना विषाणू विषयक तपासणी करण्यासाठी पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही केंद्रीय संस्था आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्र सरकारद्वारे देशातील विविध 56 ठिकाणी नमुना केंद्र आणि 52 प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, 56 नमुना केंद्र  आणि  52 प्रयोगशाळांमध्ये यांचे चांगले प्रबंधन आणि समन्वय आहे.  सुरवातीला 15 प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र परिस्थिती लक्षात घेता ही संख्या वाढविण्यात आली.  कोरोना विषाणू संदर्भात केली जाणारी चाचणी ही नियमित प्रकारची नसून प्रत्येक प्रयोग शाळेत करण्याजोगी नाही.
कोरोना विषाणूने भारतसह संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. भारतात केंद्र सरकार आणि इतर सरकारी संस्था युद्ध स्तरावर कार्य करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने अनेक खबरदारीच्या सूचना आणि दिशानिर्देश दिले आहे. यात अनावश्यक विदेश प्रवास आणि सामूहिक कार्यक्रमात सहभागी होण्यापासून टाळण्याचे आवाहन केले आहे.