Breaking News

स्पेनमध्ये एका दिवसात 700 हून अधिक बळी

नवी दिल्ली ः कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकाच दिवसात सातशेहून अधिकने वाढली आहे. तेथील बळीची संख्या चीनहूनही अधिक झाली असून, तो आता इटलीनंतर जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.