Breaking News

करोना जागतिक साथीचा आजार जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा ; भारतात कोरोनाचे 73 रुग्ण


नवी दिल्ली : कोरोना विषाणू जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. महिन्याभरापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूमुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. चीनच्या वुहानपासून फैलावत गेलेला हा विषाणू आता राज्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. चीनव्यतिरिक्त कोरिया, इटली, इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (थकज) करोना विषाणूची जागतिक साथ पसरत असल्याचे घोषित केले आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 73 वर पोहोचली आहे. राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तरप्रदेशमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 1 लाख 18 हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे तर 4 लाख 200 हून अधिक संशयित रुग्णांची संख्या आहे. चीनमधील वुहान हे प्रांत कोरोनाचे केंद्रबिंदू आहे. डिसेंबरपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या देशातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने अनेक देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. 13 मार्चला मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परदेशातून येणार्‍या नागरिकांमुळे देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, आंतरराष्ट्रीय संघटना  याव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. करोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला असून जगभरातील आतापर्यंत जगातील सुमारे 4 हजार लोकांचा या जीवघेण्या साथीच्या आजाराने बळी घेतला आहे. भारतात देखील आज करोनाच्या रुग्णांच्या संख्येत आणखी 13 रुग्णांची भर पडली असून भारतात हा आकडा दुपारपर्यंत 73 वर जाऊन पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आजाराचा जागतिक साथीचा आजार घोषित केले आहे. भारतातील हरयाणा या राज्यानेही आज करोनाला साथीचा आजार घोषित केले आहे. करोना हा आजार चीन देशाच्या सीमेत मर्यादित न राहता तो जगभर पसरत असल्याने या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक साथीचा आजार घोषित केले आहे.
 
  . .
केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

देशात सर्वाधिक करोनाबाधित केरळ राज्यात आढळले आहेत. इथे 17 जणांना करोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर नंबर लागतो तो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात 11, उत्तर प्रदेशात 10 तर दिल्लीत 6 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जे सहा नवीन करोनाबाधित सापडले आहेत त्यापैंकी तीन जणांनी दुबईमार्गाने अमेरिकेचा प्रवास केला होता. भारतात या लोकांच्या संपर्कात आलेले तब्बल 1400 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.