Breaking News

पारनेरच्या जनता दरबारात शेकडो तक्रारी 88 प्रकरणांचे निवारण


पारनेर/ प्रतिनिधी ः
येथे आयोजित जनता दरबारात शेकडो तक्रार अर्ज दाखल झाले. महसूल विभागाअंतर्गत प्रलंबित सात-बारा नोंदी, शिधापत्रिका, फेरफार दुरूस्ती, जमीन वाटपाबाबत गावागावांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. 
आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी जनता दरबार घेतला. महसूल विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा जनता दरबारात करण्याचा प्रयत्न तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला.
        पारनेर पंचायत समितीसह पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलिस या विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सांगून जास्तीत तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्यात आला.
        गेल्या महिन्यात अलेल्या अनेक प्रलंबित प्रश्‍नांच्या शासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 88 प्रकरणांचे निवारण जनता दरबारात करण्यात आले.
तहसील कार्यालयातील सर्व 40 प्रकरणांवर कार्यवाही झाली आहे. लवकरच ही सर्व प्रकरणे मार्गी लागतील, असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.
पंचायत समिती कार्यालयातील एकूण 10 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी सर्व  तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले. महावितरण कार्यालयातील 22 तक्रारींचे निवारण करण्यात आले, असे उपअभियंता आडभाई यांनी सांगितले. भूमी अभिलेख 11, सहाय्यक निबंधक एक, सावर्जनिक  बांधकाम उपविभागाच्या चार तक्रारींचे निवारण करण्यात आले.
     गटविकास अधिकारी किशोर माने, देवकुळे, रामदास दरेकर, भोसले या प्रशासकीय अधिकार्‍यांसह सुदाम पवार, राहुल झावरे, बापू शिर्के, विक्रम कळमकर, कारभारी पोटघन, विजय औटी, श्रीकांत चौरे, बाळासाहेब खिलारी, अनिल देठे, दत्ता आवारी, डॉ. बाळासाहेब कावरे, संभाजी वाळूंज, अभय नांगरे, बाळासाहेब लंके, अरूण पवार, पोपट गुंड, संदीप चौधरी, संदीप ठाणगे, ललित गागरे, तुषार सोनावळे, आकाश पठारे, सत्यम निमसे, सुभाष कावरे यांच्यासह नीलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, सदस्य, सर्व विभागांचे अधिकारी, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक जनता दरबारात उपस्थित होते.