Breaking News

एसटीच्या चालक व वाहकांना मास्कचे वाटप प्रॉमिनंट आणि रोटरीचा उपक्रम


अहमदनगर / प्रतिनिधी 
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून राज्यभर प्रवास करणार्या एसटी चालक आणि वाहकांना प्रॉमिनंट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ इंटिग्रेटीच्यावतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. तारकपूर बसस्थानक येथे इतर जिल्ह्यातून आलेले एसटी ड्रायव्हर वाहकांसह फेरीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते, सुरक्षा रक्षकांना या मास्कचे वाटप करुन, कोरोनासंबंधी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रॉमिनंट फाऊंडेशन रोटरी इंटिग्रेटीचे अध्यक्ष जावेद शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ. अभिजीत शिंदे, रोटरीचे माजी प्रांतपाल शिरीष रायते, मनिष बोरा, डॉ. हेमांगिणी पोतनीस, वाहतुक निरीक्षक माने, थावरे, मुठाळ, सहा. वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड, अमोल सोमवंशी, सादिक शेख आदींसह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, रोटरी आणि प्रॉमिनंट फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जावेद शेख यांनी ले केले. यावेळी डॉ. अभिजीत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.