Breaking News

कॅंटोन्मेंट बोर्डाने ११ महिन्यात दिले अवघे ४२ टक्के पाणी! भिंगारवासीय जाणार ग्राहक मंचात

  शहराला नागरी सुविधा पुरविण्याचे काम कॅन्टोन्मेंट बोर्ड करते. त्या नागरी सुविधांपैकीच एक म्हणजे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होय. मात्र चालू वर्षाच्या ११ महिन्यांमध्ये फक्त ४२ टक्के पाणीपुरवठा झाल्याचे निदर्शनास आले आहे. भिंगारमधील सूज्ञ नागरिकांना चालू आथिेक सन २०१९ -२० च्या  ११ महिन्यांमध्ये सुटलेल्या पाणीपुरवठ्याची नोंद केलेली आढळली. दुहेरी आर्थिक खर्चाला आणि मानसिक त्रासाला वैतागून भिंगारमधील नागरिक 'जेवढे पाणी तेवढंच बील' यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाविरुद्ध  कारवाई करणे आणि दाद मागणे कामी भिंगारकर लवकरच ग्राहक मंचात जाण्याच्या तयारी आहेत.
भिंगार शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा हा एम. आय. डी. सी. अहमदनगरकडून एम. . एस. मार्फत कॅन्टोन्मेंट बोर्डाला  होतो. नंतर ते पाणी भिंगार शहरातील नागरिकांना पुरविले जाते. चालू वर्षात म्हणजे २०१९-२० मध्ये  एपिेल ते फेब्रुवारीअखेर या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण ३३५ दिवस होतात. त्या ३३५ दिवसांपैकी  भिंगारच्या नागरिकांना फक्त १४२ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला आहे. १९३ दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. ही पाणीपुरवठा टक्केवारी फक्त ४२ टक्के इतकीच होते. वास्तविक पाहता कॅन्टोनमेंट बोर्ड पिण्याच्या पाण्याची पाणीपट्टी आकारणी ३६५ दिवसांची करत असते. पाणीपुरवठा कमी आणि पाणीपट्टी १०० टक्के हे अजबच गणित भिंगारकर नागरिकांना सहन करावे लागत आहे. जवळच असलेल्या अहमदनगर महापालिकेचे पाणीपट्टीपेक्षा जास्त दराने कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासन पाणीपट्टी आकारते. अहमदनगर शहराला पाणीपट्टी वर्षाला पंधराशे रुपये असून ती भिंगार शहराला हजार २०० रुपये आकारली जाते. जादा दराने पैसे घेतले जातात. एवढे सर्व असूनही पाणी कमी वेळ आणि कमी दिवस कमी येते. अहमदनगर शहरांपेक्षा  सातशे रुपये जास्त  पाणीपट्टी भरूनही पाणी पुरवठा  अनियमित, कमी वेळात पाणीपुरवठयाची  भिंगारमधील नागरीक हे सर्व सहन करतात.  वेळप्रसंगी १५० रुपयास ५०० लिटर यादराने भिंगारवासियांवर पाणी विकत घेण्याची वेळ कायम येते. तो खर्च महिनाभरात अंदाजे २५०० रुपये किंवा त्यापैकी कमी जादा होत असतो. चालू वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बरेचसे आंदोलन नागरिकांनी केल्यानंतर फक्त आंदोलन झाल्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा नियमित केला जातो आणि परत त्या पाणीपुरवठ्याची अनियमितता सुरु होते. पाणीपुरवठा सोडण्याची टक्केवारी आणि पाणीपट्टी आकारणी पाहता पाणी नियमित सोडणे  भिंगार  कॅन्टोनमेंट बोर्ड   प्रशासनाचे काम आहे. त्यांनी याची दखल घेऊन पाणीपुरवठा नियमित करणे गरजेचे आहे. परंतु  या पाणी प्रश्नाबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष होत आहे. पाणी पुरवठा व्यवस्थित नियमित होणे, कॅन्टोनमेंट बोर्डाकडून येणारी अवाजवी पाणीपट्टी आणि पाणी वेळेवर येत नसल्यामुळे जादा दराने पाणी विकत घेणे या दुहेरी आर्थिक खर्चाला आणि मानसिक त्रासाला वैतागून भिंगारमधील नागरिक 'जेवढे पाणी तेवढंच बील' यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला असून ही माहिती सदन कमांड पुणे आणि नवीदिल्ली येथील मुख्य कार्यालयांना कळविली जाणार आहे.