Breaking News

टाकळीभानमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार दहा दिवसांपूर्वीच दोन शेळ्यांवर हल्ला


टाकळीभान/ प्रतिनिधी ः
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात वेताळ वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. रविवारी रात्री  11च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला.
टाकळीभान- बेलपिंपळगाव रस्त्यालगत अशोक वेताळ यांची वस्ती आहे. 8 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याने वस्तीत प्रवेश केला.
बिबट्याने घरासमोर बांधलेल्या एका शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली.
   शेळीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे वेताळ कुटुंबियांना झोपेतून जाग आली. त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले तेव्हा बिबट्याने शेळीला ठार केले होते. वेताळ कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळाला. आठ ते दहा दिवसांपूर्वी राजेंद्र कोबरणे यांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या. यापूर्वीही बिबट्याने शेतकर्‍यांच्या शेळ्या, कालवडी, कुत्र्यांना ठार केले आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी टाकळीभानसह परिरातील शेतकरी वर्गातून होत आहे.