Breaking News

शोपियामध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा


श्रीनगर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघंन सुरुच असून, सोमवारी जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकी दरम्यान दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही काही दहशतवादी या भागात लपून बसले असून, लष्कराकडून शोध मोहीम सुरु आहे.
चकमकीत सुरक्षादलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. शोपिया भागात अद्यापही चकमक सुरू आहे. पोलिसांच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या रेबान भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर इथे घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आणि चकमकीला सुरूवात झाली. गोळीबार अद्याप सुरू आहे. या भागात सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशनही सुरू आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, या भागात अद्याप एक दहशतवादी लपून बसला. ऑपरेशन सुरू असल्याने अफवा पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शोपिया भागात इंटरनेट बंद करण्यात आले.