Breaking News

अनोळखी युवकाचा खून की घातपात?


अहमदनगर / प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी दि. एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. नगर औरंगाबाद महामार्गालगतच्या हॉटेल राधाई परिसरात अनोळखी युवकाचा मृतदेह असल्याची स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. या युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह टाकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मयत युवक या भागातील नसल्याने उशिरापर्यंत त्याच्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अजित पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे . पो. नि. मोहन बोरसे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मयत युवकाची ओळख पटल्याने त्याचा खून झाला की घातपात, याविषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.