Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवे महती संपूर्ण भारतभर उपनेते माजी आ. राठोड


अहमदनगर / प्रतिनिधी :
गरजू रुग्णांना अत्यल्प दरात अत्याधुनिक रुग्णसेवा देणार्या आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्याची महती संपूर्ण भारतभर झालेली असून, .पू.आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या आशिर्वादाने   .पू. प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी . सा. यांचे मार्गदर्शनामुळे या हॉस्पिटलचे सेवा कार्य बहरत आहे, प्रतिपादन माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी .सा. यांच्या २९ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त दि. ते ३१ मार्च २०२० पर्यंत सुरु राहणार्या भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा प्रारंभ माजी . राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. हर्निया, हायड्रोसिल सर्व जनरल शस्त्रक्रिया या शिबीराचा यावेळी प्रारंभ झाला. या शिबीरासाठी स्व. सुवालालजी गुगळे श्रीमती कमलबाई सुवालालजी गुगळे यांच्या स्मरणार्थ एस. बी. जी. ट्रेडर्स गुगळे परिवाराने योगदान  दिले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, आयोजक अभय गुगळे, अजित गुगळे, कल्पना गुगळे, आशा गुगळे, श्रृती गांधी, साधना गुगळे, सारिका गुगळे, सीए सोहन गुगळे, सारा गांधी, परम  गुगळे, नयन बोरा, सौरभ चोपडा, दत्ता नागापुरे, प्रकाश फिरोदिया,  डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया जैन सोशल फेडरेशनचे सभासद उपस्थित होते.
श्रृती गांधी यांनी याप्रसंगी गुगळे परिवाराच्यावतीने आपले विचार व्यक्त केले. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य अतिशय रचनात्मक असून, रुग्णसेवेची एक वेगळी उंची या हॉस्पिटलच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये आज आम्हा गुगळे परिवाराला रुग्ण सेवा कार्यासाठी योगदान देण्याचे भाग्य मिळालेले असून, यापुढेही असेच कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु राहो, यासाठीही आमचा हातभार कायम राहील, असे त्या म्हणाल्या.  या शिबीरामध्ये १३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. दि. रोजी मधुमेह, थायरॉईड ग्रंथ विकार संबंधीत आजाराचे शिबीर होणार आहे. या मोफत शिबीराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सोशल फेडरेशनच्यावतीने करण्यात आले आहे.