Breaking News

महिलांनी मानसिकता बदलण्याची गरज : न्या. जाधव


अहमदनगर / प्रतिनिधी :
महिलांनी महिलांना समजून घेतल्यास अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते. महिलांनी मानसीकता बदलल्यास अन्याय करणार्या महिला त्या सहन करणार्या महिलांच्या भूमिकेत बदल होईल. जेष्ठ नागरिकांच्या कायदेविषयक तरतुदी संबंधी प्रतिपादन करताना त्यांनी हा कायदा तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही. तो पोहोचण्याची गरज आहे. नुसते कायदे करुन हातात काही येत नाही. तर कायदे सर्वांना माहिती होणे त्याची अंमलबजावणी होणे महत्वाची आहे. काळाच्या ओघात महिलांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना  जाधव यांनी केले.
विविध न्यायालयीन खटल्यांचा संदर्भ देऊन आपले मत मांडून महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. न्यू लॉ कॉलेज, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर न्यायाधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनानिमित्त जेष्ठ नागरिक, महिला बालहक्क संरक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी न्यायमूर्ती जाधव बोलत होत्या. न्यू लॉ कॉलेज येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रा.. दरे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, सस्थेचे सदस्य जी. के. पाटील, जयंत वाघ, निर्मला काटे, अरुणा काळे, ॅड. शारदा लगड, सी. वायकर, निलीमा जाधव आदींसह ग्रामीण भागातील सरपंच, शिक्षिका महाविद्यालयीन युवती उपस्थित होत्या. या कार्यशाळेत समाज पालकाकडून बालकांचे संरक्षण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ॅड. सुरुणा मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्दितीय सत्रात माजी सरकारी वकिल ॅड. योहान मकासरे यांनी लैंगीक गुन्हयापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ हा कायदा अतिशय ओघवत्या भाषेत प्रतिपादित केला. प्रास्ताविक प्राचार्य एम. एम. तांबे यांनी केले.  उपमहापौर मालनताई ढोणे, मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके यांनी आपल्या भाषणात महिलादिनाचा इतिहास जागतिक पातळीवर त्याचे स्थान याचा आढावा घेतला. तर सध्याची महिलांची विविध क्षेत्रात असलेली आघाडीचा परामर्श घेतला. पाहुण्यांची ओळख प्रा. रामेश्वर दुसुंगे यांनी करुन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. पांढरे प्रा. दुसुंगे यांनी मानले.