Breaking News

पाच मिनिटांत वैद्यकीय चाचण्या करणारे मशिन! 'सिटीकेअर'मध्ये सुविधा


अहमदनगर / प्रतिनिधी :
वैद्यकीय क्षेत्रात प्रभावी उपचारासाठी आजाराचे अचूक निदान आवश्यक असते. यासाठी अनेक तपासण्या करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणारे आणि अचूकता वाढवणारे अत्याधुनिक मशिन तारकपूर येथील सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आले आहे. या मशीनद्वारे तब्बल २२ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या फक्त पाच मिनिटात करता येतात. जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळावा, यासाठी हॉस्पिटलमध्ये फक्त ४९९ रुपयांत या चाचण्या करण्याची विशेष सवलत सुरु झाली आहे. या मशीनद्वारे केलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट काही मिनिटात रुग्णाला मोबाईलवर तसेच ईमेलवर उपलब्ध होतील. नगरमध्ये प्रथमच ही अत्याधुनिक सुविधा सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे, अशी माहिती डॉ. संदीप सुराणा यांनी दिली.
अत्याधुनिक उपचार सुविधेसाठी नावाजलेल्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचे हे मशिन लावण्यात आले आहे.  यात कॅल्शियम,  लिपीड प्रोफाईल,  एच .बी., बी. एस. एल., इलेक्ट्रोलाईटस, ऑक्सिजन लेव्हल आदी तपासण्या करण्याची सोय आहे. त्यामुळे वेगवेगळ्या तपासण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून तपासणीचा खर्चही अत्यल्प असणार आहे. या जागतिक दर्जाच्या या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सिटी केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.