Breaking News

'यंग बॉईज'ने पटकाविला कॅंटोन्मेंटचा 'प्रेसिडेंट कप'


भिंगार / प्रतिनिधी :
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल प्रेसिडेंट कप सामन्यांचा अंतिम सामना औरंगाबाद यंग बॉईज आणि लॉरेन्स क्लब या दोन संघांमध्ये नगर भुईकोट किल्ला  मैदानात खेळविण्यात आला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना अटीतटीचा होऊन प्रथम सत्रामध्ये दोन्ही संघ एकही गोल करू शकले नाहीत. सामन्याचा दुसरा हाफ अत्यंत चुरशीचा झाला. यामध्ये यंग बॉईज संघाला मिळालेल्या संधीचा फायदा घेत सामन्याच्या ४० व्या मिनिटांमध्ये यंग बॉईज संघाने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली आणि शेवटपर्यंत आघाडी टिकवुन सामना जिंकून 'प्रेसिडेंट कप' आपल्या संघाचे नाव नोंदविले.
या सामन्याच्या बक्षीस समारंभामध्ये विजयी आणि उपविजेत्या संघाला कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष वि. एस. राणा तसेच  स्मार्ट सिटी, पुणे प्रोजेक्टचे सीईओ  राजेंद्र जगताप यांच्या हस्ते करंडक व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि नगर जिल्हा फुटबॉल संघटनाद्वारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विद्याधर पवार, राणा परमार, लॉरेन्स स्वामी, संघटनेचे सचिव गाॅडवीन डिक आदी उपस्थित होते. सामने यशस्वी होण्याकरता कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, मुकादम छजलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यांना संघटनेचे सचिव व सहसचिव गॉडविन डिक आणि गोपीचंद परदेशी आणि सर्व पंच यांचे सहकार्य लाभले. पूर्ण सामन्यांचे सूत्रसंचालन अरविंद कुडिया यांनी केले. तसेच सामन्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता महेंद्र सोनवणी, अभियंते राजेंद्र फुलसौंदर, योगेश बोरुडे, यांचे विशेष सहकार्य लाभले. या सामन्यांसाठी अहमदनगर जिल्हा संघटनेचे पदाधिकारी जोगासिंग  मिनहास, खालीद सय्यद, प्रदीप जाधव, रमेश परदेशी, अमरजीत सिंह, बाबूलाल शेख, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद, कलीम शेख, रविंद्र लालबोंद्रे, महाराष्ट्र बँकेचे रिजनल मॅनेजर राजीव कदम, भिंगार अर्बन बँकेचे मॅनेजर हजारे, संचाल नाथा राऊत, महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजर श्रीमती विनिता सिनकर आदी उपस्थित होते.