Breaking News

स्टेट बँकेने कमी केलेल्या व्याजदरांचे बाजारात हादरे


सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय स्टेट बँकेने निधी आधारित कर्जदरांमध्ये कपात केली. यामुळे कर्जे किंचित स्वस्त झाली आहेत. मात्र त्याचवेळी बँकेने मुदत ठेवींवरील व्याज तसेच बचत खात्यावरील व्याज कमी केले आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना फटका बसणार आहे. बचत खात्यातील किमान शिलकीची मर्यादा काढून टाकत बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नवे दर नुकतेच लागू करण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने धडाधड कमी केलेल्या व्याजदरांचे हादरे बाजारात जाणवल्याविना राहणार नाहीत. केलेल्या व्यवहारांमधून शेअर बाजाराची जी अतोनात धूळधाण झाली, तिने गुंतवणूकदारांचे किमान दहा लाख कोटी रुपये गिळंकृत केले. ही परिस्थिती जरी सावरली तरी यापुढेही भांडवली बाजारात उत्पात होणारच नाहीत, असे नाही. या संकटांचा सगळ्यांत मोठा फटका शेअर बाजारात पुरेशी काळजी न घेता उतरणार्‍या छोट्या व मध्यम गुंतवणूकदारांना बसू शकतो.
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय स्टेट बँकेने निधी आधारित कर्जदरांमध्ये कपात केली. यामुळे कर्जे किंचित स्वस्त झाली आहेत. मात्र त्याचवेळी बँकेने मुदतठेवींवरील व्याज तसेच बचत खात्यावरील व्याज कमी केले आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदार व खातेदारांना फटका बसणार आहे. बचत खात्यातील किमान शिलकीची मर्यादा काढून टाकत बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नवे दर नुकतेच लागू करण्यात आले आहेत. स्टेट बँकेच्या बचत खात्यात सध्या एक लाखापर्यंतच्या शिलकीवर 3.25 टक्के व्याज मिळते. एक लाखांपेक्षा अधिक रकमेवर 3 टक्के व्याज मिळते. आता मात्र सरसकट 3 टक्के मिळणार आहे. याचा परिणाम बँकेच्या 44.51 कोटी बचत खात्यांवर होणार आहे. बचत खात्यावरील व्याजदर घटवल्यामुळे नाराज झालेल्या खातेदारांना त्यांच्या खात्यात किमान शिलकीची मर्यादा काढून टाकत बँकेने थोडा दिलासा दिला आहे. सध्या स्टेट बँकेच्या खातेदारांना महानगरांमध्ये तीन हजार, निमशहरी भागात दोन हजार तर ग्रामीण भागात एक हजार रुपये किमान शिल्लक बचत खात्यात ठेवावी लागत होती. ही शिल्लक न ठेवल्यास बँक दरमहिना पाच रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत दंड आकारत असे. मात्र आता असे होणार नाही. त्याचप्रमाणे खात्यातील उलाढालीची माहिती देण्यासाठी बँक पाठवत असलेल्या एसएमएसवरील शुल्कही माफ केले आहे.ते काहीही असले तरी सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे
स्टेट बँक ऑफ इंडियाने धडाधड कमी केलेल्या व्याजदरांचे हादरे बाजारात जाणवल्याविना राहणार नाहीत. केलेल्या व्यवहारांमधून शेअर बाजाराची जी अतोनात धूळधाण झाली, तिने गुंतवणूकदारांचे किमान दहा लाख कोटी रुपये गिळंकृत केले. ही परिस्थिती जरी सावरली तरी यापुढेही भांडवली बाजारात उत्पात होणारच नाहीत, असे नाही. या संकटांचा सगळ्यांत मोठा फटका शेअर बाजारात पुरेशी काळजी न घेता उतरणार्‍या छोट्या व मध्यम गुंतवणूकदारांना बसू शकतो. आज सार्‍या जगातल्या शेअर बाजारांवर संकटे घोंघावत आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था दौडत असल्याचे सांगितले जात असले तरी परवा न्यूयॉर्क शेअर बाजार कोसळू लागल्याने व्यवहार काही काळ बंद ठेवावे लागले. करोनासारखी सार्‍या जगावरची समान संकटे आणि भारतातली येस बँकेसारखी खास देशी संकटे यांचा संगम झाल्याने शेअर बाजाराची दैना झाली. आज जगावर नजर टाकली तर कच्च्या तेलाच्या किमती धडाधड कोसळत आहेत. तेल उत्पादक आखाती देश आणि रशिया यांच्यातील तात्पुरत्या तडजोडीने त्या किंचित सावरल्या असल्या तरी जोवर जग करोनाच्या तावडीतून सुटत नाही, तोवर तेल डळमळतच राहणार. तेलाचा ढळलेला हा तोल जगभरातील शेअर बाजारांना वारंवार तडाखे देत राहील. आजवर, करोनाचे रुग्ण भारतात सापडत नव्हते. आता पुण्यापाठोपाठ आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईतही करोनाचे रुग्ण सापडल्याने या भयाचे कापरे शेअर बाजारात नव्याने शिरले तर आश्‍चर्य वाटायला नको. त्यातच, येस बँकेतील गैरव्यवहारांमुळे सार्‍या बँकिंग क्षेत्रावर संशयास्पद वातावरण आहे. त्याच्याही सावल्या शेअर बाजाराला ग्रासत आहेत. गेल्या आठवड्यात काही बँकांचे समभाग चढले. मात्र, ही तेजी किती फसवी होती, हे कळायला चार दिवसही जावे लागले नाहीत. अशा परिस्थितीत सार्‍या जगाच्या भांडवली बाजारांमध्ये पैसा ओतणारे बलाढ्य गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. करोनाचे भय झपाट्याने परस्परावलंबी झालेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे नेमके किती गंभीर आणि किती काळ नुकसान करणार आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय हे गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसा टाकतील, असे दिसत नाही. त्यांच्या या सावधगिरीचा फटका केवळ भारतीय शेअर बाजाराला बसला नसून तो जगातील अनेक देशांना बसतो आहे. गेल्या काही दिवसांतल्या जगातील महत्त्वाच्या शेअर बाजारांची पडझड पाहिली तर हे लक्षात येईल.
महिनाभरात दुसर्‍यांदा बँकेने ठेवीदरात कपात केली आहे. रिटेल टर्म ठेवींवर (दोन कोटी रुपयांपेक्षा कमी) मिळणारे व्याज 0.10 ते 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. सात दिवस ते 45 दिवस या कालावधीत मुदतपूर्ती असणार्‍या ठेवींवर आता 4.50 टक्क्यांएवजी 4 टक्के व्याज मिळणार आहे. एक वर्षापेक्षा अधिक मुदतपूर्ती कालावधी असलेल्या ठेवींवर 0.10 टक्का कमी व्याज मिळेल. त्यामुळे एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 6 टक्क्यांऐवजी 5.90 टक्के व्याज मिळणार आहे. याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्क्यांऐवजी 6.40 टक्के व्याज मिळणार आहे. 180 दिवस व त्यापेक्षा अधिक मुदतीच्या दोन कोटींपेक्षा अधिक रकमेच्या बल्क टर्म ठेवींवरील व्याजदरात 0.15 टक्के कपात करण्यात आली आहे. या प्रकारच्या एक वर्ष व त्यापेक्षा अधिक मुदतीच्या ठेवींवर आता 4.75 टक्क्यांऐवजी 4.60 टक्के व्याज मिळेल. स्टेट बँकेने निधी आधारित कर्जदरामध्ये (एमसीएलआर) कपात केली आहे. त्यामुळे कर्जे किंचित स्वस्त झाली आहेत. एक वर्ष मुदतीच्या कर्जांवरील एमसीएलआर 0.10 टक्के घटवून 7.85 टक्क्यांवरून 7.75 टक्के करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात एमसीएलआर दरामध्ये बँकेने केलेली ही दहावी दरकपात आहे. एक दिवस मुदतीच्या व एक महिना मुदतीच्या एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के कपात होऊन तो 8.05 टक्क्यांऐवजी 7.95 टक्के करण्यात आला आहे.
जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या सुदृढ अर्थव्यवस्था असणार्‍या देशांपासून काहीशा अस्थिर अशा युरोपातील अनेक देशांचे शेअर बाजार धास्तावले आहेत. भारतातही तेच झाले तर त्यात नवल नाही. जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण लवकरच काही घोषणा करणार आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याने केवळ त्यांच्या या शब्दांवर भरवसा ठेवून आशिया खंडातील तसेच इतरही शेअर बाजार काहीसे वधारले. पण करोनाच्या भयगंडामुळे सार्‍या जगाच्या अर्थकारणाची चाके हळूहळू पण निश्‍चितपणे रूतत चाललेली असताना ट्रम्प अशी कोणती जादूची कांडी फिरवणार आणि जगाची अर्थव्यवस्था व शेअर बाजार तारून नेणार, हा प्रश्‍नच आहेच. तरीही, न्यूयॉर्क शेअर बाजाराची पडझड वॉशिंग्टनमध्ये होणार्‍या घोषणेच्या अपेक्षेने रोखली गेली. भारतीय अर्थव्यवस्था ही बर्‍याच प्रमाणात स्वयंपूर्ण असल्याने आणि देशांतर्गत बाजारपेठेचा आकारच अवाढव्य असल्याने जागतिक धक्के सोसण्याची भारताची क्षमता गेल्या काही वर्षांत निश्‍चितच वाढली आहे. मात्र, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी सध्या तरी काही काळ शेअर बाजाराची जपूनच चाल खेळावी लागणार आहे, अन्यथा ते गोत्यात येवू शकतात.. जगाचे किती प्रचंड प्रमाणात जागतिकीकरण झाले आहे, याचा विपरीत अनुभव करोनाच्या संकटाने नव्याने आणून दिला आहे. भारतीय भांडवली बाजारातील हादरे हे त्याचेच एक प्रत्यंतर आहे. आता शेअर बाजार असाच डळमळता किंवा अस्थिर राहिला तर त्याचे अधिक घातक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे, जगातील गुंतवणूकदार तोंड फिरवत राहिले तरी सरकारच्या ताब्यातील वित्तसंस्था तसेच बँका पुढे सरसावून शेअर बाजार सावरतात का, हे पुढच्या लवकरच कळेल. गुंतवणूकदारांचा विश्‍वास टिकवून बाजारातील भय दूर करायचे असेल तर अर्थमंत्र्यांनी संसदेत आश्‍वासक निवेदन करून वित्तसंस्थांना भांडवली बाजार सावरण्याचे स्पष्ट निर्देश द्यायला हवेत.