Breaking News

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच


नवी दिल्ली : काश्मी
रमधील अनंतनाग जिल्ह्यात 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला रविवारी सकाळी यश आले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली. अनंतनाग जिल्ह्यातील दियालगाम गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. जवानांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे.
 माहितीनुसार अनंतनाग स्थित वटरीगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीनुसार जेव्हा परिसराला घेरण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. बराच वेळ चकमक सुरु होती. त्यात 4 दहशतवाद्यांना मारण्यात आले. अद्यापही गोळीबार सुरु आहे आणि एक दहशतवादी त्याच परिसरात लपलेला आहे. भारतीय लष्कराने पूर्ण परिसर घेरलेला आहे आणि प्रत्येक घरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. मागील आठवड्यात शोपिया सेक्टरमध्ये चकमक झाली होती. त्यात लष्कर ए तैयबाचे 2 दहशतवादी मारले गेले होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख शब्बीर अहमद मलिक उर्फ अबू माविया उर्फ वदीना मेलोहरा निवासी अमीर अहमद डार अशी झाली आहे. पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन दहशवादी मलिक दक्षिण काश्मीरमध्ये विविध दहशतवादी घटनेत सहभागी होत होते.