Breaking News

बालिकाश्रम शाळेला पिठाची गिरणी भेट

अहमदनगर/ प्रतिनिधी : येथील रोटरी क्लबचे प्रांतपाल सुहास वैदय, उपप्रांतपाल प्रताप पांडे,माजी प्रांतपाल शिरीष रायते, नीलेश शहा, नमिता शहा यांच्या हस्ते  कै.जानकीबाई आपटे बालिकाश्रम शाळेला पिठाची गिरणी व (सॅनेटरी नॅपकीन नष्ट करण्याचे मशीन) इन्सिनिरेटर देण्यात आले. 
यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष दत्ता दीक्षित, सचिव प्रसन्न खाजगीवाले, खजिनदार उमेश रेखे, निवृती झिने, क्लब संस्थापक डॉ.श्रीकृष्ण जोशी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा  वैजयंती जोशी व प्रकल्प लाभधारक सर्व क्लब सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी आश्रम शाळा पांगरमल, जिल्हा परिषद शाळा  पिंपळगाव, श्री भैरवनाथ विद्यालय आगडगाव, मूकबधीर संस्था पाथर्डी, मनपाची लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शाळा क्र. 23 केडगाव, वि.ल.कुलकर्णी नगर, जिल्हा परीषद पाढरेवस्ती  शाळा  देहरे, गणपतराव मते पाटील शाळा डोंगरगण, मनपाची ओंकारनगर शाळा केडगाव, मनपाची बाळासाहेब ठाकरे शाळा गांधीनगर बोल्हेगाव या शाळा ई लनिंग किटचा प्रकल्प हस्तातरण करण्यात आले.
तसेच ऩृसिंह विद्यालय भातोडी पारगाव येथे शहा परिवाराकडून बोअरवेल सुविधा करून दिली आहे.प्रताप पांडे यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन राजेश परदेशी यांनी केले. आभार प्रसन्न खाजगीवाले यांनी मानले.