Breaking News

मानवसेवा हिच खरी ईश्‍वर सेवा : हभप तनपुरे


अहमदनगर / प्रतिनिधी :
मानवसेवेचे व्रत मानवसेवा प्रतिष्ठान जपत आहे. प्रत्येकाने समाजातल्या प्रत्येक गरजूवंत मानवासाठी कार्य केले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो. समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजसेवा केलीच पाहिजे, मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय संत ... ब्रदीनाथ महाराज तनपुरे यांनी केले. मानवसेवा प्रतिष्ठानने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ग्रामीण भागातील १०१० ज्येष्ठ महिला, घटस्फोटीता, परितक्त्या, दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सत्यभामा तनपुरे, जि. . सदस्या संध्या आठरे, जि. . सदस्या मोहन  पालवे, माजी सभापती संभाजी पालवे, आदर्श अंगणवाडी सेविका अलका मतकर, द्रौपदाबाई मतकर, देविदास मतकर, सरपंच अलका वांढेकर, चेअरमन रामकिसन वांढेकर, मुख्याध्यापिका संगीता भापसे, संगीता शेळके, डॉ. अविनाश म्हस्के, जय युवाचे अध्यक्ष ॅड. महेश शिंदे, रयतचे पोपटराव बनकर, आधारवडच्या ॅड. अनिता दिघे, ज्येष्ठ विधीज्ञ ॅड. भानुदास होले, नयना बनकर, रजनी ताठे, युनिव्हर्सलचे सागर आलचेट्टी मानवसेवाचे अध्यक्ष प्रा. सुनील मतकर आदि उपस्थित होते. ज्येष्ठ विधीज्ञ ॅड. भानुदास होले आदी उपस्थित होते.