Breaking News

...आणि खासदार झाले निशब्द श्रीगोंद्याच्या जनता दरबारात गाेंंधळ


कोळगाव/ प्रतिनिधी :
खासदार डॉ. सुजय विखे यांनी श्रीगोंद्यात सोमवारी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडला. पदाधिकार्‍यांनीही तक्रारी मांडल्याने या दरबारात एकच गोंधळ उडाला. खासदार यामुळे निशब्द झाले होते.
  सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात जनता दरबार भरवला होता. या ठिकाणी  माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, श्रीगोंदे पाटबंधारे विभागाचे अधिकारी, बेलवंडी व श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे अधिकारी व  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        त्यावेळी महसूल व वनविभाग या दोन कार्यालयाच्याबाबत सातबारा नोंदी, सातबारा दुरुस्ती, अधिकारी यांनी वापरलेले अपशब्द, तलाठी वेळेवर येत नाही, अशा अनेक तक्रारींचा पाऊस पडत होता.
 भूमिअभिलेख कार्यालयाबाबत मोजणी अधिकारी कामचुकारपणा करतात, अशा तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.
 श्रीगोंदे पोलिस ठाण्याबाबत पोलिस निरीक्षक तथा बिट अंमलदार यांच्याकडून गुन्हा अथवा तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा लोकांकडून पाढा वाचला जात होता. पंचायत समितीच्या अनेक विभागांच्या तक्रारींचा भडीमार झाल्याने खासदार निशब्द झाले. तालुक्यात भरविलेला जनता दरबार यशस्वी की अयशस्वी झाला या बद्दल वेगवेगळ्या चर्चेला तालुक्यात उधाण आले होते.