Breaking News

कोपरगावात दुकानावर सशस्त्र दरोडा गावठी कट्ट्याच्या धाकाने ७० हजारांची लूटकोपरगाव / ता.प्रतिनिधी
 तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील संभाजी चौकातील दुकानावर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.
यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांकडील सत्तर हजारांची रक्कम लंपास केली. कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटयांनी पोबारा केला.
 शहरातील मोरे व्यापारी संकुलातील तळमजल्यावर प्रवीण शोभाचंद कोठारी यांचे कोठारी सेल्स कॉर्पोरेशन नावाचे कोलगेट विक्रीची ठोक मालाची एजन्सी आहे. ते आपला माल दिवसभर आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत विकून सायंकाळच्या सुमारास त्यांचा हिशेब घेऊन रोकड जमा करतात. नेमकी रक्कम  जमा होण्याची वेळ हेरून त्यांनी रात्री साडेआठ वाजता गावठी कट्ट्याचा वापर करत दरोडेखोरांनी थेट गावठी कट्टा कानाला लावला दुसऱ्याने थेट गल्ल्यात हात घालून सत्तर हजार रुपये हस्तगत केले. त्यांनतर त्यांनी आपला मोर्चा आतील दालनात प्रवेश करण्यासाठी वळवला. ही बाब कोठारी यांच्या लक्षात आली. त्यांनी आत येत असलेल्या दरोडेखोरांचा प्रतिकार करून आतील बाजूने दरवाजा बंद केल्याने पुढील अनर्थ टाळला. दरोडेखोरांनी हा दरवाजा लाथ कोयत्याने तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.  दरम्यान बाकी कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी धूम ठोकली. घटनेनंतर कोठारी यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी संपर्क साधला. परंतु तो पर्यंत दरोडेखोरांनी विना क्रमांकाच्या पल्सरवरून धूम ठोकली होती.
 या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी  घनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे आदींनी भेट दिली.