Breaking News

अखेर निर्भयाला मिळाला न्याय ! दोषींना लटकवले फासावर


नवी दिल्ली ः संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषींना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. तब्बल सात वर्षांच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर निर्भयाला आज न्याय मिळाला आहे, अशी भावना यावेळी निर्भयाच्या आईनं व्यक्त केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला.
दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री 12.00 वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून  लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. अखेर साडेपाच वाजताच्या सुमारास  निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही  दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना नराधमांना फाशी देण्यात आली. पहिल्यांदाच 4 जणांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 2004 नंतर तब्ब्ल  16 वर्षांनंतर फाशीची शिक्षा दिली गेली. उशीरा का होईना आम्हाला न्याय मिळाला. हा दिवस भारताच्या तमाम मुलींसाठी आहे. त्यांना  अखेर फाशीची  शिक्षा मिळाली,  हा दीर्घ लढा होता. मी यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारचे आभार मानते अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली आहे. सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला, 20 मार्च 2020, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धातास महत्त्वाचा होता, अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वतःच्या बचावाचा बराच प्रयत्न केला. दिलेल्या वृत्तानुसार, फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला. पण, अखेर सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आणि मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आले. तिहार तुरुंगात एकाचवेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना एकाचवेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. यातील एक खटका (लीवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, तर दुसरा जेलच्या स्टाफने. त्यापूर्वी पहाटे 3.15 वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेवून जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळून राहिलात्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बर्‍याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्यावेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींच्या गळ्याभोवतीचा फास आवळला. रात्री उशिराही दोषींची फाशी टळावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावत फाशीचा निर्णय कायम ठेवला.