Breaking News

पेट्रोल-डिझेल तीन रुपयांची महागणार केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने कमी होत असतांना सुध्दा केंद्र सरकारने उत्पादन शुक्लात वाढ केली  आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत. महागाईमध्ये आता जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती 3 रुपये प्रति लिटरने वाढणार आहेत. कच्च्या तेलाचे दर सतत घसरत असल्याने सरकारने उत्पादन शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. अधिकृत सूचनेनुसार, उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर 2 ते 8 रुपयांनी वाढू शकतात. त्याचबरोबर डिझेल दर प्रति लिटर 4 रुपयांपर्यंत वाढू शकते. दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात  3 रुपयांनी वाढ केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकराच्या या निर्णयाविरोधात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 30 % नी कमी झाल्या असताना देशात किंमती कमी करून सामान्यांना त्याचा लाभ देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लि.3 रू. वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा उद्योग सुरु केला आहे, असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला.