Breaking News

'करोना'च्या पार्श्वभूमीवर शेंद्रा येथील यात्रा स्थगित ठेवा : अँड. पोळ


कोपरगाव / ता. प्रतिनिधी
देशभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असून या पार्श्वभूमीवर शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रा यंदा स्थगित ठेवावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
या निवेदनात पुढे म्हटले आहे, की चीनमधून सुरू झालेला कोरोना विषाणूच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहे. संसर्गजन्य पद्धतीने हा विषाणू फैलावत असून औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मांगीरबाबा यात्रा भरत असते. या यात्रेत महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातून लाखो मातंग समाजाचे भाविक हजेरी लावतात, या यात्रेत अनेक भाविक कोंबडे बकऱ्याचा बळी देतात मात्र या यात्रेत प्रशासनाकडून भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, राहुटी टाकण्यास जागा, शौचालयाची कोणतीही सुविधा पुरवली जात नाही. भाविकांची संख्या कोंबडे ,बोकड बळीची प्रथा विचारात घेता यात्रेत भाविकांना या साथी पासून बचाव करणे अवघड होणार आहे. औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमान तळ आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी परदेशातून येत असतात. त्यामुळे या यात्रेत या साथीचा फैलाव जलद गतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी यावर्षी ही यात्रा स्थगित ठेवावी. या निवेदनावर लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश
सरचिटणीस नामदेवराव गायकवाड, कामगार आघाडीचे मराठवाडा प्रमुख बी. आर. पारसकर जिल्हाध्यक्ष अतुल खंडगावक आदींच्या सह्या आहेत.