Breaking News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण


नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाचे निमित साधत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सम्मान करीत नारी शक्ती पुरस्कारांचे वितरण केले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री देबश्री चौधरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रविवारी झालेल्या समारंभात पडला भूदेवी, भारतीय वायू सेनेच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक मोहना जितरवाल, अवनी चतुर्वेदी, भावना कंठ तसेच सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती, अरफा जान, चामी मुर्मू, भागीरथी अम्मा, कार्थ्ययनी अम्मा, मन कौर या विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी वाजविणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरणात विशेषतः वंचित आणि गरीब महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती, गट, संस्थांना दरवर्षी नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात येते.