Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटल गरजू रुग्णांचे हे आशास्थान : घुले होमिओपॅथी शिबीर उत्साहात


अहमदनगर / प्रतिनिधी :
समाजातील दु:ख कमी व्हावे, गोर-गरीबांना अत्यल्प दरात उपचार मिळावेत, यासाठीच आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांना अपेक्षित असलेले कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचे व्रत जोपासत गरजूंच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले आहे. अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने या हॉस्पिटलच्या माध्यमातून असलेले रुग्णसेवेचे हे कार्य आज देशभर लौकिक पावले आहे. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे हे आशास्थान बनले आहे. जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या माध्यमातून करत असलेले नि:स्वार्थ व सेवाभावी कार्य समाजातील दु:ख कमी करण्यास जो पुढाकार घेत आहे, तो कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलचे हे सेवाकार्य यापुढील काळातही समाजाला दिलासा देणारे असून हे हॉस्पिटल गरीब आणि गरजू रुग्णांचे आशास्थान आहे, असे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष, नगरसेवक अविनाश घुले यांनी केले.
आचार्यश्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या २९ व्या पुण्यस्मृतीदिनानिमत्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. रामनाथ काकाणी यांच्या स्मरणार्थ काकाणी परिवाराच्या सहकार्याने आयोजित होमिओपॅथी शिबीराचे उद्घाटन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मनपा महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, माजी नगरसेवक सचिन जाधव, होमिओपॅथी तज्ञ डॉ. शैलेश संचेती, कोपरगांवचे उद्योगपती विजय बंब, श्रीमती बसंती काकाणी, श्रीकांत काकाणी, अनुराधा काकाणी, शशिकांत काकाणी, सचिन काकाणी, स्वाती काकाणी, संदिप काकाणी, राखी काकाणी, कविता काकाणी, सोनल काकाणी, सौरभ काकाणी व जैन सोशल फेडरेशनचे आदी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन जाधव यांचे भाषण झाले. याप्रसंगी डॉ. शैलेश संचेती म्हणाले, हॉस्पिटलमध्ये असलेल्या आत्याधुनिक मशिनरीद्वारे रुग्णांची थॉयरोईड, हार्मोन्सविकार, त्वचा विकार आदिंवर उपचार करुन रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेक आजार हे होमिओपॅथीमुळे कायमस्वरुपी बरे होतात. या शिबीरात ८२ रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. शिबीरासाठी जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी तसेच डॉक्टर्स, नर्सेस आदिंनी परिश्रम घेतले.