Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार मास्कचे वाटप! माजी उपाध्यक्ष मुसा सय्यद यांचा पुढाकार


भिंगार  / प्रतिनिधी :
केंद्र शासन आणि राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करुन देशामध्ये तसेच राज्यामध्ये जनतेला आवाहन केले आहे. गर्दी टाळावी. असे आवाहन करुन जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक गोष्टींना आळा बसून कोरोनाला हद्दपार करता येईल. त्यामुळे हा आजार वाढू नये,  यासाठी कॉन्टोनमेंटचे माजी उपाध्यक्ष मुसा सय्यद यांनी शहरातील नागरिकांना सतर्कता म्हणून पाच हजार मास्क चे वाटप केले आहे.
ते म्हणाले, जनतेने या रोगाला रोखण्याची जबाबदारी सर्वांची असून आपण जास्तीत जास्त सुचनांचे पालन केले पाहिजे. यावेळी शेजबाज सय्यद, आजु सय्यद, मनोज धिवर, मयुर भोसले, मोसीन खान, सलमान सय्यद, सौफयन सय्यद मतिन शेख, सोनु बाखरे, इब्राहिम सय्यद आदी उपस्थित होते.