Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी शिबीर

अहमदनगर/ प्रतिनिधी : राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषी म.सा. यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये स्व.जतनबाई माणकचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ व बोथरा परिवाराच्या सहकार्याने आयोजित हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
 याप्रसंगी आयोजक माणकचंद बोथरा, पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, नगरसेवक योगीराज गाडे, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर, रोनक बोथरा, रोहन बोथरा, प्रणीत बोथरा, महेश तोडमल, गिरीश वर्मा, व्हीआरडीईचे भाऊसाहेब म्हस्के, डॉ. वसंत कटारिया, डॉ.आशीष भंडारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ.वसंत कटारिया यांनी केले. या शिबिरात 210 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. कार्डिओलॉजीस्ट डॉ.किरण दीपक, डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अनिकेत कटारिया, कार्डियाक अ‍ॅनेस्थेटीस्ट डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, एम.डी. मेडिसीन डॉ. प्रवीण डुंगरवाल, डॉ.राजेंद्र गिरी यांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये गरजेनुसार रुग्णांची बायपास, अ‍ॅन्जिओप्लास्टी, अ‍ॅन्जिओग्राफी, बीएमव्ही व हृदयातील झडप बदलण्याची शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. तसेच महात्मा फुले जोतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत या हृदय शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे सदस्य व हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.