Breaking News

जुन्या पेन्शन संदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू:आ.लंकेपारनेर/प्रतिनिधी
 जुन्या पेन्शन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कॅचरचा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन आ. नीलेश लंके यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
  संगीताताई शिंदे राज्याध्यक्ष शिक्षण संघर्ष संघटना यांच्या नेतृत्वाखाली व कोअर कमिटी जुनी पेंशन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद मैदान मुंबई येथे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या 1982 च्या पेंशन मागणीसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला आमदार नीलेश लंके यांनी भेट दिली. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात अनेक वर्षे तुम्ही विनाअनुदानावर काम करून सरकारचा भार उचलला आहे. मात्र तुम्हालाच पेंशन पासून वंचित ठेवले आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे. या बाबतीत मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करील. त्यासाठी लवकरच शिक्षणमंत्री, वित्तमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांचेशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
   यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्ष संगीता शिंदे, कोअर कमिटीचे कार्याध्यक्ष सुनील भोर, सचिव महेंद्र हिंगे, सुदाम दळवी, भगवान रसाळ, विनायक शेळके, देविदास खेडकर, रमजान हवालदार, देवराम दरेकर, सुनील दानवे, संजय इघे, सतीश गांजुरे, दिलीप डोंगरेसह हजारोंच्या संख्येने सेवक उपस्थित होते.


 जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य 2005 आधीच्या लोकांसाठी नसून त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. तसेच येत्या काही दिवसांमध्ये आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात शिष्टमंडळ भेटणार आहे.
 - सुदाम दळवी,
सदस्य, जुनी पेन्शन योजना समिती