Breaking News

कोरोना व्हायरस : उगीचच बाऊ का करता? निर्धाराने लढा, विजय तुमचाच!


आपल्याकडे फार पूर्वी प्लेगचा आजार आला, त्यानंतर कॅन्सरचा आजार आला, एचआयव्ही एड्सचा आजार आला. मात्र यातून आपण सावरलोच कि नाही? त्यामुळे सुयोग्य उपचार, योग्य काळजी आणि कमालीच्या सकारात्मकतेच्या बळावर कोरोनावर मात करता येऊ शकते, हे आपल्यातल्याच एका भारतीय कोरोनाग्रस्त रुग्णाने सर्वांनाच सांगितलं आहे. कोरोनावर मात केल्यानंतर स्वगृही परतलेल्या या रुग्णाने आता इतरांच्या मनात कोरोनाविषयी असणारी भीती दूर करत जनजागृती करण्याचा निर्धारही केला आहे. दरम्यान, चीनच्या वुहानमध्येच कोरोनाशी १०३ वर्षांच्या आजीबाईंनी यशस्वी झुंज दिली. यावरून कोरोना व्हायरसमधून चीनमध्ये अनेक वृद्ध सावरत आहेत, हे स्पष्ट झालेय. तर मग आपण उगीचच कोरोनाचा बाऊ का करावा? आता यापुढे बिनधास्त निर्धारानं लढा, कोरोनावर विजय मिळवाल, याची आम्हाला पक्की खात्री आहे
मागील आठवड्यात १०० वर्षांच्या एका व्यक्तीवरही मिलिटरी डॉक्टरांनी उपचार केले. त्या उपचारानंतर ती व्यक्तीही कोरोनातून बचावल्याचं वृत्त समोर आलंय. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरीही त्याचून बचावलेल्यांचा आकडाही या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये दिलासा देणारा ठरत आहे. परदेशातून आलेल्या पण सध्या लक्षणे दिसणार्या नागरिकांना १४ दिवस त्यांनी घरातच स्वत:ला वेगळे ठेवण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र, हे नागरिक त्याकडे दुर्लक्ष करुन समाजात फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे ज्यांना होम क्वारेंटाइन करण्यास सांगितले आहे. त्यांच्या हातावर स्टॅम्प मारण्यास राज्यात सुरुवात झाली आहे. जेणे करुन हे बाहेर समाजात वावरु लागले तर लोकांच्या ही गोष्ट लक्षात येईल. देशात सर्वाधिक ३८ कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दररोज परदेशातून मोठ्या संख्येने प्रवासी आता देशात परत येत आहेत. त्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांच्यामध्ये सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाही, त्यांना स्वत:च्या घरात वेगळे राहण्यास सांगितले जात आहे. अशा संशयितांवर होम क्वारेंटाईन असा शिक्का मारण्यात येत आहे. त्यावर तारीखही लिहिली जात आहे. तोपर्यंत संशयिताने घरीच वेगळे राहणे अपेक्षित आहे. आज मानव जातीपुढे उभ्या राहिलेल्या या प्रश्नावर किमान समाधानही असल्याची सकारात्मक बाजू पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोनाचे जवळपास दहा रुग्ण सावरले असून त्यांना रुग्णालयातून गरी पाठवण्यात आलं आहे. म्हणजेच हा आकडा काहीसा कमी झालेला स्पष्ट होत आहे. एकट्या चीनमध्येही कोरोनातून बचावलेल्यांचा आकडा समाधानकारक आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास ७० हजारहून अधिक रुग्ण बरे झाल्याचंही वृत्त आहे. दरम्यान कोरोनातून सावरलेले रुग्ण अद्यापही कमालीची काळजी घेत असून, इतरांशी संपर्क टाळत आहेत.
कोरोना अंगावर काढण्यासारखा आजार नव्हे!
कोरोनाग्रस्त आजाराची लागण झालेल्या रुग्णांनी किमान १४ दिवस घराच्या बाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये, या आजाराचा फैलाव अन्यत्र होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्यावी, आहे खरे आहे. पण जे ठणठणीत आहेत, निरोगी आहेत, त्यांच्या कामधंद्यांचे, पोटापाण्याचे काय? कोरोना आजाराच्या भितीमुळे बाजरपेठ ओस पडतात की काय, बँका चार दिवस बंद राहणार आहेत. त्यानंतर कंपन्यांना टाळे लावले जाते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण घराच्या बाहेर पडले नाही तर चूल कशी पेटणार, अशी अनेकांची बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे कुठलेही काम करतांना काटेकोरपणे काळजी घेणे, वारंवार स्वच्छ हात धुणे आणि थोडीशीही शंका आली की लगेच डॉक्टरकडे जाणे हे कराच. कारण कोरोना व्हायरसचा आजार अंगावर काढण्यासारखा नाही.