Breaking News

शासकीय इमारतींची गुणवत्ता सांभाळा आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना


कोपरगाव/ प्रतिनिधी ः
कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध शासकीय इमारतींचे काम गुणवत्ता सांभाळून वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.
शहरातील तालुका पशु लघुचिकित्सालयाच्या संरक्षक भिंतीच्या 56 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हिरामण गंगुले, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी महेमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, मधुकर टेके यावेळी उपस्थित होते.
  आमदार काळे यांनी पशु लघुचिकित्सालयाच्या सर्व कर्मचार्‍यांशी चर्चा केली. त्यांना येणार्‍या अडचणींची आमदारांनी माहिती घेतली. त्यांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या शासकीय इमारतींच्या बांधकामाची पाहणी केली.
कोपरगाव शहरात सुरु असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची, नगरपालिका इमारत, पोलिस ठाणे इमारत, बसस्थानक इमारतीच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. बसस्थानकामध्ये व्यापारी संकुल उभारण्याची माहिती त्यांनी  घेतली. सर्व इमारतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी ठेकेदारांना दिल्या.
  सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, फकीर कुरेशी, रमेश गवळी, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, राहुल देवळालीकर, निखिल डांगे, रवींद्र चिंचपुरे, चंद्रशेखर म्हस्के, दिनेश पवार, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, नितीन शिंदे, दिनकर खरे, लक्ष्मण सताळे, रावसाहेब साठे, विजय त्रिभुवन, नितीन त्रिभुवन, सलीम पठाण, संतोष टोरपे, नीलेश पारखे, योगेश नरोडे, रावसाहेब जपे, विद्यासागर शिंदे, शंतनू धोर्डे, बाळासाहेब कडू, बार असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष लोहकणे, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, स्वप्नील डहाळे, काकासाहेब शिंदे, उपअभियंता विजय भंगाळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभिजित चौधरी, गोविंद मालाणी, कुणाल सोनवणे, शीतल भुतडा, भूषण बागुल, डॉ. पी. वाय. ओहोळ, डॉ. एस. एम. काटे, सी. एस. होन यावेळी उपस्थित होते.