Breaking News

गौरवचे पेंटिंग कौशल्य उद्याचे भविष्य : पवार


अहमदनगर / प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्राबरोबरच आजच्या विद्यार्थ्याला विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपले आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्या क्षेत्रात करिअर करुन आपला ठसा समाजासमोर उमठावा. अहमदनगरच्या गौरव भोसलेने पेंटिंग क्षेत्रात घेतलेले मास्टर ऑफ फाईन आर्ट या शिक्षण व त्यातून केलेली प्रगती ही गौरवांकितआहे. त्याचे हे उज्ज्वल भविष्य आहे, अशा शब्दांत राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवचे कौतुक केले. गौरव हा मनपाचे नगरसेवक गणेश भोसले यांचा मुलगा आहे.
गौरवने रेखाटलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानभवानाचे चित्र उपमुख्यमंत्री पवार यांना भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, नगर हे कलावंत व कलाकारांचे  शहर आहे. या शहरामध्ये अनेकांनी आपल्या क्षेत्रात काम करुन शहराचे नाव राज्याच्या नकाशावर झळकावले आहे. गौरवने कमी वयात पेंटिंगचे शिक्षण घेऊन काम करत आहे. तोही भविष्यकाळात उत्कृष्ट हॅण्ड पेंटिंग कलाकार म्हणून ओळख निर्माण करील.