Breaking News

नगरसेवक लोंढेंविरुद्ध दाखल गुन्हा मागे घ्या शिवसेनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन


अहमदनगर / प्रतिनिधी :
नगरसवेवक सुभाष लोंढे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून राजकीय द्वेषाने लोंढे यांना या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे नगरसेवक लोंढे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी शहर शिवसेना आणि नगरसेवकांनी प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक सागर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी . अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय शेंडगे, धनंजय जाधव, संतोष गेनप्पा, शाम नळकांडे, दत्ता जाधव, गणेश कवडे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की नगरसेवक लोंढे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्याद देणारे आणि नगरसेवक लोंढे यांचा काडीमात्र संबंध नाही. महेश अशोक चव्हाण हे लोंढे यांचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय द्वेषातून लोंढे यांचे नाव गोवण्यात आले आहे.