Breaking News

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळावा : डॉ. शिंदे

अहमदनगर / प्रतिनिधी : चांगला आहार, व्यायाम व चांगले विचार तुमच्या जीवनात बदल घडवतात.  जीवनाच्या यशस्वी वाटचालीसाठी या गोष्टी प्रामुख्याने कराव्यात. शरीरासाठी ड जीवनसत्व मिळणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी रोज सकाळी कोवळा सूर्यप्रकाश घ्यावा. आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेचे अनेक फायदे आहेत. या चिकित्सा पद्धतीचा आता सर्वत्र वापर वाढतो आहे. आयुर्वेद उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढलेला आहे. याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. आजकाल सोशल मीडियाचा अतिरेकी वापर होत असून, तो टाळल्यास तुमच्या जीवनात बदल घडल्याचे तुम्हाला दिसून येईल, असे प्रतिपादन येथील साईसंजीवनी आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाच्या डॉ. शुभांगी शिंदे यांनी केले.
दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान बिशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयात जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार, मुख्याध्यापिका मंदा हांडे, प्रशांत वमन, प्रयागा वामन, रामभाऊ वामन, आदिनाथ घुगरकर, शरद गायकवाड, पुष्पा म्हस्के आदी उपस्थित होते. प्रशांत वामन याचा यावेळी डॉ. शुभांगी शिंदे यांच्या हस्ते विद्यालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा म्हस्के यांनी केले. संगीता दळवी यांनी आभार मानले.