Breaking News

कोरोनाचा धसका! आगामी पंधरा दिवस सर्वच शासकीय कार्यक्रम रद्द करा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन


अहमदनगर / प्रतिनिधी    
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्वयंअनुशासन पाळत स्वतःची स्वतःच काळजी घ्या, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करा,यात्रा-जत्रांमध्ये गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, हस्तांदोलन टाळा, अनावश्यक गर्दी करू नका, असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे. आगामी पंधरा दिवस सर्वच शासकीय कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहन त्यांनी खासगी संस्थांना केले आहे.
दरम्यान, या कालावधीत शाळा आणि महाविद्यालय सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना व्हायरससंदर्भात माहिती देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, इराण, दक्षिण कोरिया, चीन, स्पेन,जर्मनी, इटली आणि फ्रान्स या सात देशातून येणाऱ्या-जाणाऱ्यावर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये १३ आणि १४ मार्च रोजी होणारा शासकीय ग्रंथ महोत्सव रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिनेमागृह, मॉलमध्ये काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुढे म्हणाले, यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द कराव्यात. लोकांना प्रशिक्षित कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग करण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवाववी. जे या सूचनांचे पालन करणार नाही, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.