Breaking News

पंढरपूरातील निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करणार : खासदार विखे

अहमदनगर/ प्रतिनिधी : नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या पंढरपूर येथील 6 गुंठे जागेत पायी दिंडीमध्ये येणार्‍या भाविकांच्या व इतर भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी निवासस्थान उभारण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन खासदार सुजय विखे यांना देण्यात आले. 
निवेदनात म्हटले आहे की, रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट हा मा.धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणीकृत ट्रस्ट असून नोंदणी क्रमांक ए-1195/ अ.नगर असा आहे. गेल्या 18 वर्षांपासून ट्रस्ट
द्वारे भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, तसेच आषाढी एकादशीची पंढरपूर येथे मोठी दिंडी असते. ट्रस्टद्वारे पंढरपूर येथे सुमारे 6 गुंठे जागा घेण्यात आलेली असून तेथे निवासासाठी बांधकाम प्रयोजित असून संस्थेच्या पायी दिंडीमध्ये येणार्‍या भाविकांच्या व इतर भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी त्याचा उपयोग करावयाचा आहे. त्या संबंधीचा नियोजित नकाशा व जागेचा उतारा जोडला आहे. ट्रस्टला उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे निवासस्थानाच्या बांधकामासाठी योग्य ती बांधकामाची मदत अगर निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून भाविकांच्या निवासाची सोय होईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, खजिनदार एकनाथ वाघ, सदस्य साहेबराव भोर, दतात्रय विटेकर, राजू भोर, गोरख कातोरे, शरद भोर, गोरख वाघ, नीलेश भाकरे, भालचंद्र भाकरसह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.