Breaking News

करोनासंदर्भात राज्य सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी


मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोरोना विषाणू संसर्गाची काळजी म्हणून सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यातील जनतेस केले.यासोबतच राज्याने कोरोना व्हायरसची लढण्यासाठी हेल्पलाईन नंबर 020-26127394 जारी केला आहे. यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकाने (बीएमसी) शहरातील नागरिकांना या व्हायरससंदर्भात माहिती देण्यासाठी 24÷7 हेल्पलाईन क्रमांक 1916 जारी केला आहे. जगभरात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम शाखेला दिले आहेत. महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण आढळला नसून नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करू या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.